STORYMIRROR

yogesh Chalke

Others

3  

yogesh Chalke

Others

दुष्काळ

दुष्काळ

1 min
925


किती फाटली फाटली

धरा माझ्या भवताली

देवा काय गुन्हा माझा

दशा अशी आज झाली



कशी जगू मी ,भागवू

भूक माझ्या तान्हुल्याची

कशी सांभाळू मी देवा

धुरा माझ्या संसाराची



रडे विहीर एकाकी

नाही पाणी नयनाला

दोर असा कुसलेला

लाज वाटे पोहर्‍याला



तुझ्या मंदीरात घंटा

पहा नित्य वाजे देवा

नाही काम नाही दाम

कसा कर्जाला फेडावा



चारापाण्याविण झाली

दशा गाय वासराची

नको वाटे हंबरडा

चुक काय यात त्यांची



उभा झाड शेतामध्ये

पाने सारी गाळोनिया

त्यास वाटे आज कोण

येई गळफास घ्याया


नभी मेघ हिणवती

त्यांना फुटेना पाझर

देवा सोसावा दुष्काळ

सांगा आम्ही जन्मभर


Rate this content
Log in