दुष्काळ
दुष्काळ
अतीवापराची नितीमत्ता
निसर्ग कोप नव्हाळीचा नाही
पुर्तता करणे सोपे नाही
म्हणुनच म्हणतात संतही
सांभाळा अमुल्य संपदा ही....!!
दुष्काळ येतो अन् जातोय
कुणासही नाही सोडत सारभूता
विपत्तीचे मुळ कारण आपणच
सोडा अतीवापराची नितीमत्ता.....!!
अती घाणीचे साम्राज्य नको
अती खाण्यापाण्याची चंगळ
येती दुष्काळी सावट स्वास्थावर
नाही होत कुणाचे ही मंगळ....!!
अती पाण्याचा वापर करणे
अती विजेचा वापर करणे
पर्याय निघाले म्हणुन काय
सांगोपांग त्याचा फायदा घेणे.....!!
समजून उमजून निर्धास्त असे
कसे हे आपले वागणे विदृपता
विचार करावा सृष्टीचा आता
मानवाचा जन्म असे बुद्धीदाता....!!
पशुपक्ष्यांचा आवाज येत नाही
भकास झालेत वनविहार
ओसाड भूमाता रडती आहे
भेगा पडल्यात तिच्या अंगावर....!!
उन्हाचे तेज वाढले आहेत
होरपळतात अरण्यात प्राणीमात्र
तडफडतात पाण्यावाचून
दुष्काळाच्या झळेने मरती गात्र....!!
झाडे लावू झाडे जगवू
घनदाट हिरवळ वृक्षाची छान
आभाळातल्या ढगाला बोलवू
दुष्काळाला मागे फिरवू........!!
