STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

दुष्काळ एक मोठी समस्यां...!

दुष्काळ एक मोठी समस्यां...!

1 min
379

दुष्काळ एक मोठी समस्या...!


सकाळ दुपार संध्याकाळ

तसाच सुकाळ आणि दुष्काळ

कालानुरूप घडणारे येणारे

नैसर्गिक कालचक्र....


सारे काही कालाच्या 

ओघात घडत जाणारे

हवे नको ते सारे

दिवस दाखवत राहणारे....


मानवाचा जन्मच मुळात

भोग भोगायला लावणारा

सुखाबरोबर दुःखही

बरोबरीने भोगायला लावणारा....


समस्यां कधीच पाठ सोडत नाही

सुख असो की दुःख

आशाच साऱ्या भोगाचे कारण

श्रीमुख हेच प्रत्येक क्षणी तारण.....


मोठी असो की छोटी असो

समस्यां समस्यांचं असते

प्रत्येक क्षणी ती 

आवासून अंगावर येत असते...


ही ही वेळ निघून जाईल

इतकेच म्हणून सामोरे जायचे असते

उन्हा बरोबर शीतल सावली ही

जीवनात येत असते...


कोणी तरी म्हंटलेच आहे

दोन घडीचा डाव याला जीवन ऐसें नाव

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

म्हणजे सौख्य समाधान शांतीचे

मिळेल अवचित सौभाग्याचे गाव.....!


Rate this content
Log in