STORYMIRROR

Anil Date

Others

4  

Anil Date

Others

दुनियादारी

दुनियादारी

1 min
27.9K


मिळे नं विसावा

उन्हात तापल्या

झाडास सावल्या

दुरावल्या


पिळलेला ऊस

फेकतात जैसा

केला माझा तैसा

उपयोग


जमली नं मला

ही दुनियादारी

झाली व्यवहारी

नातीगोती


झिजणेच आहे

भाग्य चंदनाचे

सर्वांग तयाचे

सुगंधीत


शिकलो मी आता

काट्यांशी लढणे

काट्यात वाढणे

फुलापरी


Rate this content
Log in