दोस्ती... दुनिया सारी
दोस्ती... दुनिया सारी
1 min
28
एकाचीच बाईक आणि
मित्रांची रग्गड सवारी
टपरीवरचा कडक चहा
आणि उरलीसुरली मारी
कितीही काड्या केल्या
तरीही अभंग अशी यारी
भेटलीच जर 'ऐश्वर्या' कुणी
तर चालायचीच हेराफेरी
कधी हलकट अशी फितुरी
तर कधी जगात भारी हेरगिरी
मित्रांसाठी नापास होण्याची
कुठेच नाही अशी जिगरी
अडलाच कुठला यार तर
होती वाट्टेल ते करण्याची तयारी
भटकायला बाहेर पडलो तर
पायाला बांधलेली फक्त भिंगरी
सिनेमाच्या तिकटासाठी ठरलेली
पैशांसाठी नको तिथे उदारी
दुनियेची फिकीर कसली राव
दोस्ती म्हणजेच होती "दुनिया" सारी.
