Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others Children

3  

Neha Ranalkar

Others Children

*दिपावली:- एक आनंद पर्व*

*दिपावली:- एक आनंद पर्व*

1 min
380


आली दिवाळी दिवाळी बघा

नवचैतन्याचा दीप घेऊनी हाती |

आकाशदिवे,पणत्या,रांगोळ्यांनी

घरेदारे शृंगारिली दिनराती | |१| |


गाय,वासरांची होतसे पूजा

घराघरांत गोवत्स द्वादशीला |

धन व धन्वंतरीची पूजा करतात

रंकराव धनत्रयोदशीला | |२| |


पणती दक्षिण दिशेस लावून

करतात कुणी यमास दीपदान |

नर्क चतुर्दशीला सानथोरांना घडते

मंगल अभ्यंग स्नान | |३| |


प्रसन्न सारी मने झाल़ी लावताच

सुगंधीत उटणी अन् साबणं |

बंधूसाठी बहिणीने देवाकडे केलं

सौख्य,आरोग्याचेच मागणं | |४| |


भाऊबीजेला तिला ओवाळणी

भाऊ देतसे अती प्रेमाने |

आतिशबाजी फटाक्यांची सुरू

होई उत्साहात जोमाने | |५| |

 

शेव करंजी चकल्या बर्फी चिवडा

एकमेकांवर आळीपाळीने रुसले | 

लाडू अनारसे सांजो-यांना पाहून 

शंकरपाळे आणखीनच फुगले | |६| |


लाडवां सवे कडबोळ्यांनी तर

भारीच केली बाई कमाल |

शेव,चिवडा,बर्फी,अनारसे खाऊन

पाहुण्यांनी उडवली धमाल | |७| |


पाहुण्यांमुळे दिवाळीच्या सणाची 

खरोखरच वाढते रंगत |

पुजन,फटाक्यांच्या आतिशबाजी 

नंतर होई जेवणाची पंगत | | ८| |


दररोज रात्री फटाक्यांची होत

राहते घरोघरी सुंदर आरास |

पाहूनी सुतळी बाॅम्बला लवंगी

फटाके होतातच निराश | |९| |


फुलबाजे व सुंसुंद्री मावशीही

पेटल्यावर चांगलीच तडतडे |

कुंडी आत्याचा पाहून तिलाच

पारा आणखीनच वर चढे | |१०| |


सू सूं करीत रॉकेट दादा कसा

आकाशात उंचच उंच जाई |

बघून त्याला भूई चक्राची मात्र

भलतीच जीवावर येई | |११ | |


अशी सुंदर दिवाळी आयुष्यात

रोज रोजच का येत नाही? |

नव्या पोशाखा संगेे फराळ असता

दिवाळी सणाची नवलाई | |१२| |


Rate this content
Log in