दीपोत्सव
दीपोत्सव
1 min
278
लक्ष लक्ष दीप येती
उजळूनी धरेवरी
शुभेच्छांची देवघेव
जनमनी ये अधरी
आरोग्यास दे प्राधान्य
ठेवा शरीर निकोप
व्यायामाची नित्य जोड
नाही कोरोना प्रकोप
आनंदाने दीपावली
आली आपुल्या अंगणी
देऊ आधार मदत
सुख नांदेल सदनी
तेजोमय वसुंधरा
दीप लागले मानसी
चंद्र तारकाही देती
आशिर्वच वसुधेसी
दीपोत्सव धरेवरी
अवकाश तेजोमय
दीपावली मनातली
करी मने हर्षमय !!
