STORYMIRROR

Pandit Warade

Others

2  

Pandit Warade

Others

ध्यास

ध्यास

1 min
2.7K


कशाला मुलाचा उगा ध्यास आता

धरावी मुलीची मनी आस आता


असे कोणते क्षेत्र बाकी उरावे

नसावा मुलीचा तिथे श्वास आता


तुझी जन्मदात्री असे एक नारी

मनाला नसावा तिच्या त्रास आता


नको वाटते ती जरा, दुःख, व्याधी

दिसावा प्रभूचा तिथे वास आता


मुली का मराव्या इथे रोज गर्भी

असा जन्म व्हावा तिचा खास आता


मनाने सदा स्वच्छ साधे असावे

नको 'पंडिता'लाच आभास आता


भुजंगप्रयात

लगागा, लगागा, लगागा, लगागा.


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్