STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

धुंधर मास

धुंधर मास

1 min
190

करू साजरा धुंधर, मास नव्हाळी

वालं मटर गवार,मास नव्हाळी ।।धृ।।

आला रे ;धुंधर मास,पेट पुजा करू खास

हेमंत ऋतू चा वास,मास नव्हाळी।।१।।

ताबंड फुटता राजा,जठर फुकतो बाजा

गाजर हलवा भाजा,मास नव्हाळी।।२।।

काकडा किर्तनी साज,उडीद बाजरी बाज

साग्रसंगीत अंदाज, मास नव्हाळी।।३।।

लेकुरवाळी ती भाजी, धुंधर मासी ती आजी

सुर्य अर्ध्य; नैवेद्य जी, मास नव्हाळी।।४।।

सुर्य फिरे धनु राशी,अन्न लागे शरीराशी

अन्नपुर्ण ब्रम्ह काशी,मास नव्हाळी।।५।।

घरी विरजले दही,लोणी ताकाची फोडणी 

बाजरी ठेचा भाकरी,मास नव्हाळी।।६।।

कवळी चवळी संग,ताजी भुईमुंग शेंग

चुलीस भाजा पापड,मास नव्हाळी।।७।।

विठ्ठल विठ्ठल भजा,राम राम नाम पुजा

सकाळीच उठे आजा,मास नव्हाळी।।८।।

जांब बोरं हरभरा, अंद्रक संबार गोळा

लसूण कांदा पात चीरा,मास नव्हाळी।।९।।

तीळगुळ गोड लाडू,गुळ पोळी तुप वाढू

आयुर्वेदी मार्ग काढू, मास नव्हाळी।।१०।।


Rate this content
Log in