STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

धर्म दिसे ? ( अभंग रचना )

धर्म दिसे ? ( अभंग रचना )

1 min
225

धर्माच्या नावाने | घडती दंगली |

माणूसकी मेली I आतंकात ॥ १ ॥


असे शिकवण | समान धर्मांची I

बात श्रेष्ठत्वाची | कशासाठी ? ॥ २ ॥


प्रत्येक मानवा | हक्क जगण्याचा |

तांडव मृत्यूचा | धर्म सांगे ? ॥ ३॥


तो आतंकवाद | आता थांबवावा I

बोध खरा घ्यावा I तो धर्माचा ॥ ४ ॥


धर्मांध शक्तीच्या I आहारी हो किती |

रक्ताळल्या हाती | धर्म दिसे ? ॥ ५ ॥


Rate this content
Log in