STORYMIRROR

Vijay Sanap

Others

4  

Vijay Sanap

Others

धोंड्याचा महिना

धोंड्याचा महिना

1 min
40.9K


आला धोंड्याचा महिना

लवकर जावई पटवा

पुरण पोळीचे जेवण

खायाला सासरला पाठवा ।।धृ।।

कोळ्या मनात माझ्या

भलतच येतय काळं

त्याच्यासाठी मी घालते

भरत्यात तुरीची दाळं

कुणी सांगा ना बाई गं

सख्याला निरोप भेटवा ।।

सांगा पाव्हणं तुम्हा

कितीक निरपं दयावं

आला आदिक महिना

सासर वाडीला यावं

भारी लाजाळू बाई गं

बुरख्याची गाडी पाठवा ।।

घ्या ध्ययानात पाव्हणं

कितीक तुम्हा सांगावं

या दारु पायी तुमचा

कुजून राहीला जीव

लय वाढलय दुःखणं

वैद्याला कुणी तरी पाठवा ।।

दारु पायीच याच्या

जीवाचे झाले हाल

घरा दारात याचा

नेहमीच जातोय तोल

लय कुटतोय बाई गं

याला चौदाव रत्न दाखवा ।।

येत मनात माझ्या

समजून घ्या हो थोडं

बाप शेतकरी माझा

नका पळवू तुमच घोडं

भारी दमलय बाई गं

झोपलय हलवून उठवा ।।


Rate this content
Log in