दहीहंडी
दहीहंडी
1 min
218
उंच बांधलेला
सुरेख मटका
दहीहंडीचा सण
आहे हटका
बाळगोपाळ चढती
उंच मनोऱ्यावरी
तोल सांभाळत
लक्ष मटक्यावरी
सवंगड्यात होई
चुरशीची लढाई
मटकी फोडण्याची
सगळ्यांना घाई
दहिदुधाचा अखेर
पडतो सडा
फोडता नारळाने
सजलेला घडा
