धडपड
धडपड
1 min
324
किती करता धडपड
जीवघेण्या जगण्याची
नका मांडू पोतडी
अवाढव्य मागण्यांची॥१॥
जगणे करा सुकर
विचार बदला तुमचे
अनाठायी अडचणींनी
अवघड होईल जीवन तुमचे॥२॥
निर्मळ जीवन जगुया
अपेक्षांना देवून फाटा
आनंदाने भ्रमंती करत
शोधाव्या नवीन वाटा॥३॥
धडपड सुखाची पाहण्या
इवलासा होई जीव
अंत समय येता वाटे
निश्चल देहाची किव॥४॥
