STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

धागेदोरे

धागेदोरे

1 min
357

जीवनात बंध मनी

प्रेमामधे भिजलेले

स्नेहभाव आपुलकी

घट्ट मनी रुजलेले   (१)


धागेदोरे संगतीने

रेषा अदृश्य दावते

तर्कमार्ग विचाराने

ध्येयाप्रती पोचवते   (२)


धागेदोरे शलाकाच

बुद्धी तर्कास चालना

शक्ती प्रेरणा कार्यास

लाभे सुयश लेखना   (३)


धागेदोरे जीवनात

जन्म आईच्या नाळेशी

नातीगोती गुंफलेली

जुळलेली प्राक्तनाशी   (४)


धागेदोरे जानव्याचे

मणीबंध सौभाग्याचे

वात्सल्याच्या रेशमाचे

सुसंगती लाभण्याचे   (५)


धागेदोरे उसवता

दुःख वैफल्य अंतरी

चुका जाहल्या जीवनी

जोडण्याचा यत्न करी   (६)


जीवनाचे वस्त्र लाभे

प्राक्तनाने विणलेले

गोड मानी सुखदुःख

जीवनास जिंकलेले   (७)


साहित्याला गुण द्या
लॉग इन