दगडावरची रेघ
दगडावरची रेघ
1 min
408
कधी कशी कोरली,
भाग्याची रेषा भाळी,
सटवाई आईची कृपा,
रेखाटी नशीबी झळाळी ।। १ ।।
काळ्या कुट्ट नभी,
चमके विजेचा लोळ,
नकळे कसा भाग्याने,
मांडला जीवनी कल्लोळ ।। २।।
कशी पुसू दगडावरची रेघ
स्त्री जीवनी दुःखाचा मेघ,
जणू भाळाचा भोगवटा,
रेखाटी विश्वासाची रेघ ।। ३।।
सुख दुःखाची दरी,
कधी मिटता मिटेना,
स्त्रीबद्दलची मानसिकता,
दृष्टीकोन काही बदलेना ।। ४।।
