देवीची साडेतीन शक्तिपीठे
देवीची साडेतीन शक्तिपीठे
*नवरात्र निमित्ताने*
*गाऊ देवीची महती*
*ऐकू देवींचे महात्म्य*
*जाणू शक्तीपीठ ख्याती*
*शक्तीपीठ कोल्हापूरी*
*महालक्ष्मी अंबाबाई*
*केला संहार दुष्टांचा*
*दॄष्टी भक्तावरी राही*
*आई तुळजा भवानी*
*राज दरबारी मान*
*अष्टभुजा शोभतसे*
*येई हाकेला धावून*
*माहूरची देवी शोभे*
*माता परशुरामाची*
*घेण्या दर्शन आईचे*
*ओढ रेणूका मातेची*
*देवी अठरा भुजांची*
*सप्तशॄंगी अर्धपीठ*
*सह्याद्रीच्या रांगांमध्ये*
*वणी मधे असे थाट*
*साडेतीन शक्तिपीठे*
*असे ॐकार स्वरूप*
*महाकाली महालक्ष्मी*
*महा सरस्वती रूप*
*घेऊ दर्शन मातांचे*
*मागू त्यासी वरदान*
*दूर होवो साऱ्या व्यथा*
*व्हावे समॄद्ध जीवन*
