देऊळ बंद
देऊळ बंद
देऊळ बंद!
म्हणे... जेव्हापासून त्याच्या कानावर पडलंय की
माणसांच्याच चुकीमुळे माणसालाच घातक असा कोरोना आलाय..
काय म्हणावं त्या देवाला देशावर संकट ओढावल्यावर
स्वस्थ न बसता देवळाबाहेर निघालाय..
घेऊनी पांढरी वस्त्र अंगावरती..
कुलूप लावलाय त्यानेच देवळाच्या दारावरती..
काय म्हणावं त्या देवाला..
दारोदारी स्वच्छ करत सुटलाय देशाला
अन् विनवण्या करतोय लोकांना
"बाबांनो घरात राहा.. आणि वेळ द्या की घरच्यांना"
म्हणे संकट हाय पोरांवरती.. म्हणूनच
कुलूप लावलाय त्यानेच देवळाच्या दारावरती..
निघालाय
वाचवाया त्याच्या पोरांना
कधी समजावून तर वेळ पडल्यास मारून
जीव घालुनी धोक्यात स्वतःचा
ऑनड्युटी चोवीस तास करतोय त्यो
आज उभा आहे तो रस्त्यावरती.. म्हणूनच
कुलूप लावलाय त्यानेच देवळाच्या दारावरती..
कधी डॉक्टर, कधी पोलिस
तर कधी कर्मचारी पण बनतोय..
घरी सोडून कुटुंबीयांना
आज इतरांची सेवा करतोय..
सगळ्या रंगाची कापड घेतलीत त्याने अंगावरती
शस्त्र घेतलीत हातात त्यानं अन् घेतलाय वसा सगळ्यांना सुखरूप ठेवण्याचा
कसलीच पर्वा न करता संकट घेतलय त्याने स्वतः वरती.. म्हणूनच
कुलूप लावलाय त्यानेच देवळाच्या दारावरती..