देशप्रेमी वीर
देशप्रेमी वीर
1 min
159
सह्याद्रीतील सह्यकड्याचे
निधडे आम्ही वीर
देशरक्षणा प्राणपणाने
तळहातावर शीर
शूर शिवाजी नि संभाजींचा
आदर्श पुढती असे
वीर मावळ्यांचे रक्त
अंगामधे खेळतसे
देशप्रेमाचे बाळकडू
दिधले आम्हां मातेने
फौजेतील लढवय्ये
सांगते अभिमानाने
देशासाठी लढताना
तन मन धन अर्पू
परमकर्तव्य करताना
प्राणांचे बलिदान करू
