'देशी' ब्रँड
'देशी' ब्रँड
देशात आता स्वदेशीला
विदेशीचा पर्याय रेडी आहे;
शाम्पू, किराणानंतर पतंजलीची
वस्त्रोद्योगात उडी आहे.
विदेशीला पतंजलीच्या देशी
ब्रँडची बाजारी रंगरंगोटी;
स्वदेशीचे प्रतीक म्हणून
रामदेवबाबांच्या कमरेला लंगोटी.
'योगा ते उपभोक्ता' असा
बाबांचा प्रवास वंदनीय;
महिलांसाठी पतंजलीचा
'आस्था' ब्रँड अभिनंदनीय.
पतंजली खादीनंतर आलीय
देशी 'जीन्स'ची लाट;
धनत्रयोदशीला पतंजली स्टोअरचा
दिल्लीत उद्घाटनी थाट.
खऱ्या राष्ट्रप्रेमाने भारावलेला
दुसरा बाबा पाहिला नाही;
पतंजलीचे कोणते 'प्रॉडक्ट' येईल
याचा नेम राहिला नाही.
विदेशीपेक्षा स्वदेशीवरच 'प्रेम'
आपले वाढले पाहिजे;
पतंजलीने यासाठी देशी
'डिझेल-पेट्रोल' काढले पाहिजे.
'अध्यात्म व राजकारण'
झालेय एकमेकांत 'मिक्स';
हे दुसरे तिसरे काही नसून
आहे 'आर्ट ऑफ पॉलिटीक्स'
