STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

डोळाभर (अभंग)

डोळाभर (अभंग)

1 min
12.1K

माणसाची नाही | वर्दळ कोठेही I

शांत हा रस्ताही I अचानक ॥ १ ll


मोरांची सवारी I रस्त्यावर येता I

पोपट ही आता I सोबतीला ॥ २ ॥


साळुंकी साधते | मार्ग तो मधला I

रांगेत ठाकला I उभा असा ॥ ३ ॥


भक्ष ते शोधण्या | तो ताफा पक्षांचा I

नाही तो भीतीचा I लवलेश ॥ ४॥


हिरवाई शोभे I बाजूला कडेला I

आणि वळणाला I झाडी दाट ॥ ५ ॥


निसर्गरम्य हा | देखावा तो पहा I

साठवत रहा I डोळाभर ॥ ६ ॥


Rate this content
Log in