दान करण्यास शिकावे..!
दान करण्यास शिकावे..!
महत्व आहे खूप दानाचे, दान करण्यास शिकावे..!
गरीब गरजू याचकाला, धीर देण्यास ही शिकावे..!
गुणवत्ता असेल अंगी आपल्या, तर ज्ञानदान करावे..!
देऊन शिक्षण दान निष्ठावंतांना, पायावर उभे करावे..!
यथाशक्ती भुकेल्या जीवांना थोडे अन्नदान करावे..!
आग शमवून पोटाची त्यांच्या, पुण्य पदरी पाडावे..!
असेल इच्छा शक्ती अंगात थोडी, श्रमदान करावे..!
देशासाठी हितकारक काम, काहीतरी रोज करावे..!
असेल वेळ थोडा स्वतः जवळी, समय दान करावे..!
चांगल्या कर्तव्यासाठी थोडा वेळ द्यायला शिकावे..!
असेल सामर्थ्य शरीरात तर, स्वेच्छा रक्तदान करावे..!
अति महत्त्वाचे असे हे दान, जीवदान देणे शिकावे..!
अन्ना एवढेच असे महत्त्वाचे, वस्त्र-निवारा दान करावे..!
उघड्यावर राहणाऱ्या गरिबांचे, घर अन् कापड व्हावे..!
सोबती न येते काही मेल्यावरती, हे नेहमीच स्मरावे..!
दानाचे पुण्य येते मागे म्हणून, कर्ण व्हायला शिकावे..!
नेत्र, अवयव आणि देहदान हे, मरणोपरांत करावे..!
प्रकट करून इच्छा आधीच, दान करण्यास शिकावे..!
दाता आणि देवविता तोच आहे, हे नित्य मनी असावे..!
कर्ता आणि करविता पण तोच आहे, हे सुद्धा उमजावे..!
