चंचल मन
चंचल मन
1 min
406
चंचल मन धावते
पिसाट होऊन राणी
नसे जगाची काळजी
सदैव असशी मानी
कधी वाऱ्यावर स्वार
कधी ढगांची गट्टी
अनवाणी धावताना
झाडाला मारशी मिठी
चंचल मन स्वप्नाळू
अवखळ ते वासरू
मनमोकळ्या आभाळी
उडते जणू पाखरू
चंचल मन बिलोरे
खळखळणारे झरे
निःशब्द होऊनी कधी
डोळ्यांनी बोलती खरे
