STORYMIRROR

Shobha Wagle

Children

3  

Shobha Wagle

Children

चला या रे

चला या रे

1 min
126

 चला यारे या सारे या

रिमझिम पावसात

मस्त आपण खेळु या

होड्या सोडु या पाण्यात.


चला पावसात भिजू

झिम्मा फुगडी खेळु या

पावसाचे गाणे गाऊ

मजा मस्ती ती करु या.


चिंब ओले होऊ चला

पाणी उडवून घेऊ

छान अशा पावसाच्या

धारा हातावर घेऊ.


गोल गोल गिरक्यांनी

अंगणात फेर धरू

उंच उंच उडया मारु

अंगणात नाच करू.


एक वेळ ती मजेची

चिंब अशी भिजायची

घेऊ लुटून मौज ही

दंगा मस्ती करायची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children