चला गड्यानो ! मतदान करूया ....
चला गड्यानो ! मतदान करूया ....
घरचं कार्य आहे ,उशीर कशाला ?
चला , उठा लवकर सज्ज व्हा
लोकशाही सक्षम करूया ...
चला गड्यानो ! मतदान करूया ....
नवा महाराष्ट्र घडवण्यास
एक वीट होऊया चला
विसरुनी मतभेद एक होऊया ...
चला गड्यानो ! मतदान करूया ....
कुणी सांगावा धाडणार
कुणी आमिष दाखवणार नक्की
पण आम्ही नाही आता भुलणार
चला गड्यानो ! मतदान करूया ....
शिवरायांचा महाराष्ट्र ,फुले शाहू आंबेडकरांचे
लोकशाहीचे वारस आम्ही स्वप्न पूर्ण करणार
भूल थापांना बळी न पडता नवा महाराष्ट्र घडवूया
चला गड्यानो ! मतदान करूया ....