STORYMIRROR

Shashikant Shandile

Others

2.3  

Shashikant Shandile

Others

==* चल चल मिनी म्याऊ *==

==* चल चल मिनी म्याऊ *==

1 min
41.1K


चल चल मिनी म्याऊ

आपण दोघं शाळेत जाऊ

मिळून वर्गामंदी आपण

छान छान गाणी गाऊ


नवी नवी घाल कापडी

पुस्तक पाटी घेऊन जाऊ

दप्तर तुझा माझा छोटा

चल पाठीवर टांगून घेऊ


अ आ इ ची बाराखडी

एका दोनाचे पाढे लिहू

प्रार्थनेची वेळ झाली

ओळीत सारे उभे राहू


चल पड मिनी म्याऊ

वेळेआधी शाळेत जाऊ

उशीर होवू नये बाळा

उगाच आपण मार खाऊ


चल चल मिनी म्याऊ

आपण दोघं शाळेत जाऊ

खेळता खेळता शिकू अन

शिकून खूप मोठं होऊ


Rate this content
Log in