चिऊताई
चिऊताई
1 min
160
आज घरा समोर
आली चिऊताई
तिला पाहुन तिची
सखी आली सोबत चिऊताई ||1||
चिव चिव करीत
मजेत त्यांनी दाणे
चोचीत पटपट टिपले
नयनांत साठले त्यांचे बहाणे ||2||
पाण्यासाठी ती भुर्कण
उंच हवेत झेपावली
चिउताई साठी सवंगड्यानो
ठेवू दाणे पाणी छताखाली ||3||