चिऊताई
चिऊताई


दारापुढे दाणे वेचाया
जमायच्या रोज चिमण्या
एकही चिमणी दिसेना आज
गेल्या कुण्या गावा
चिवचिवाट ऐकू येई
कानी माझ्या लहानपणी
दारापुढे चिऊताईसाठी
असायचा दाणापाणी
दाणे टिपताना पाहून
मौज वाटे मला भारी
जीव इवलासा तिचा
पिलांसाठी कष्ट करी
रोज पाहायची तिला
सवयच मला झाली होती
पण रोज दिसणारी चिमणी
आज दूर दूर उडाली होती
अंगण वाटे सुने सुने
चिवचिवाट ही आता थांबला
कधी येणार चिऊताई
अंगणी दाणे वेचायला