STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

चिमणी पाखरं

चिमणी पाखरं

1 min
515

आर्त भावना गाती गाणी

चिमणी पाखरं गेली उडूनी

आस मनाला लागे वेडी

येतील घरी पुन्हा परतुनी


घरात गोकुळ सजले होते

घर माझे गजबजले होते

आज सुन्या त्या झाल्या खोल्या

घरटे रिकामे झाले होते


घास पिलांना देण्यासाठी

देह झिजवला सारा मी

बळ पंखांना दिले उडाया

दूर सोडुनी गेली ती


सैरभैर हे मन रे झाले

दाही दिशांना घेई धाव

परतुनी या रे भेटाया मज

नको सोन्याच्या घासाची हाव


श्वास चालला देहातूनी या

धूसर सारे जग झाले

या ना परतुनी पाखरांनो तुम्ही

भेटीस व्याकुळ मन झाले


Rate this content
Log in