चिखल
चिखल
1 min
7.7K
आयुष्याचे दान मागले ना
मी कुणाला प्राण मागले ना
या उन्हाचे घाव सोसल्यावर
चांदण्यांना जाब मागले ना
फुकट्यांचा मार खात होतो
वेदनांचे दाम मागले ना
हारल्याचे कबूल यांस झालो
जिंकण्याचे स्वप्न मागले ना
बोलतो ते ऐक सामर्थ्याने
जे कधीही मात्र ऐकले ना
चिखल होता गर्द भोवतीने
पण तरीही अंग माखले ना