छंद
छंद
1 min
297
सिंथच्या वादनातूनी
खट्याळ, अवखळ स्वर उमटे
गाणी उडत्या चालीची
हा छंद जीवाला लावी पिसे (1)
व्हायोलिनचे आर्त स्वर
अंतःकरणाला भिडती
कंठस्वराच्या जवळिकेनी
दुःख,दर्द आळविती (2)
सूरांसूरांतून शब्द उमटे
लय, तालाची गट्टी जमे
आनंदाची कारंजी उडती
हा छंद जीवाला लावी पिसे (3)
