छंद असावा एखादा
छंद असावा एखादा
1 min
460
छंद असावा एखादा
माणसाला आनंदी जगण्यासाठी
माझा छंद जोपासते मी
काव्य लेखणीतून स्फुरण्यासाठी...
छंद बनते वेड जेव्हा,
वेळीच त्याला रूप द्यावे सार्थकतेचे
छंदातून मिळावे समाधान
मिळावे कधी समाजभान,
करावे छंदातून मनोरंजन...
छंद माझा कोणता
हे सांगणे कठीण
कधी आवडतो प्रवास एकांती
कधी घेते लेखणी हाती,
कधी चित्र रेखाटले भिंतीवर
कधी समाजसेवा घडली निरंतर...
छंद असा मनाचे दालन समृद्ध करणारा,
असावा एखादा निखळ छंद,
माझा छंद कायम असतो
माझ्या सोबतीला,
आनंदी ठेवतो सदैव मजला!
