STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

4  

Sunita Anabhule

Others

चांदणचुरा

चांदणचुरा

1 min
471

पुनवेचा चांद नभी सजला,

रुप पाहून चांदण्या लाजल्या,

नटूनथटून साऱ्या गोळा झाल्या

त्याज भेटायला अधीर जाहल्या ।।1 ।।


निळ्याशार आभाळी अवतरली,

चांदण्यांची सुंदर सुंदर नक्षी,

पाहुनी सारी अचंबित झाली,

चांदणचुराच होता गं साक्षी ।। 2 ।।


बालपणीचा काळ सुखाचा झाला,

तारुण्याचा सारा बहर सरला,

वृद्धपणाचा आता रस्ता धरला,

आयुष्याच्या सांजवेळी धास्तावला ।। 3 ।।


Rate this content
Log in