चालतो मी निरंतर ...
चालतो मी निरंतर ...
1 min
234
चालतो मी निरंतर ...
हरेक नात्याना कुरवाळीत
पदरी मात्र निराशा अन
फुटकी थाळी ,फाटकी झोळी
कळून आले सारे काही ...
सुख दुःखांची अटळ भाषा
भोगनेचि भोग आता ...
दुःखाची ती अनिवार्यता
नाही कसा म्हणू मी ?
मीच दोषी , अतिउत्साही
मीच गाफील सदा नि की कदा
स्वयंघोषित हुकूमशहा
विश्वासाचे हमखास खांदे
कधी कुणाचे आसरा झाले ?
भावविभोर डोळे ओले
केंव्हाच ते पसार झाले
केसांनीच गळे कापणे
कुठे आजही जुने झाले ?
झाले गेलं विसरुनी जावे
ठरले आता पुढे पुढे चालावे
