चाचपडू नकोस हृदयात मित्रा
चाचपडू नकोस हृदयात मित्रा
चाचपडू नकोस हृदयात मित्रा
वेदना माझ्या अंतरीच्या
आठवणी जपून ठेवल्यात मी
सुखद माझ्या आणि तिच्या ||0||
वेडं आहे हृदय माझं
आशेचं गाजर दाखवतो मी
खोट्या खोट्या रोमँटिक दुनियेत
अलगद याला माखवतो मी
खुणा सापडतील हृदयावर
तिच्या माझ्या ओळखीच्या
आठवणी जपून ठेवल्यात मी
सुखद माझ्या आणि तिच्या ||1||
मलाही माहीत आहे चांगलं
प्रवास याचा एकटा आहे
यालाही नक्की समजतं
त्रास याचा एकटा आहे
होरपळून टाकत आहेत आता
ज्वाळा तिच्या आठवणींच्या
आठवणी जपून ठेवल्यात मी
सुखद माझ्या आणि तिच्या ||2||
फक्त श्वास घेण्यापुरतं
काम याचं असतं तर
प्रेमाच्या या विषयाशी
देणं घेणं नसतं तर
दुःख कधीच झालं नसतं
वेदना नसत्या प्रीतीच्या
आठवणी जपून ठेवल्यात मी
सुखद माझ्या आणि तिच्या ||3||
नाही कोणी आपलं तर
दुःख कशाला मानावं
जगता येतं एकटं ही
हसत हे मानावं
ओसाड रान बनलंय आता
जळून प्रेमाचा बगीचा
आठवणी जपून ठेवल्यात मी
सुखद माझ्या आणि तिच्या ||4||
