STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Others

4  

Sarita Sawant Bhosale

Others

बरसणाऱ्याला थोडतरी कळावं

बरसणाऱ्याला थोडतरी कळावं

1 min
451

रिमझिम रिमझिम बरसत तो हाहाकार माजवतो

चिंबचिंब भिजवुनी जातो

कुठे ओल्याचिंब सुखाच्या सरी बरसवतो

तर कुठे दुःखाच्या लहरी कोसळवतो

कधीतरी वाटतं बरसणाऱ्यालाही कळावं

कधी, कुठे अन किती बरसावं

काळ्या मातीत मोत्याचा दाण पिकांव

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं गूढ संपावं

लेकरांचा त्यांच्या आधार कधी न सुटावा

लेकी सुनांना त्यांच्या कधी ना यावं वैधव्य

बरसणाऱ्याने थोडी दया त्यांच्यावरही करावी

राबतो तो रात्रंदिवस,

त्याच्या हक्काचा न्याय त्याला मिळावा

घराटं त्याचंही आनंदानं बहराव

कोरडं रान त्याच्या स्वप्नीही न दिसावं

बरसणाऱ्याला थोडं तरी समजावं

शेतात घाम गाळून भरतो सर्वांचं पोट

रणरणत्या उन्हात त्याने ना फिरावं

आभाळाकडे आस लावून वाट पाहायची

वेळ त्यावर ना यावी

सुख समाधानी आयुष्य त्याचही व्हावं

आनंदाचं झाड त्याच्या अंगणी वाढावं

बरसणाऱ्याला कळावं कधी,कुठे अन किती बरसावं

निसर्गा पुढे आपण आहोत हतबल सारे

मदतीचे दोन हात आपणही सरकवावे

उपकाराचे दान फेडता आले तर फेडावे

बरसणाऱ्याला कळावे कधी, कुठे अन किती बरसावें.


Rate this content
Log in