बोलका पाऊस
बोलका पाऊस


खिडकीतून पाहत होते टपटप करणाऱ्या पाऊसाला
चमकणाऱ्या थेंबांना
झाडाच्या पानावर अलगद विसावताना
पक्षी झटकत होते आपले पंख
डुलत डुलत कागदी होड्या ही पाऊसाच्या पाण्यात होती तरंगत
टपटप आवाज चालू होता
जणू काहीतरी सांगत होता
मी मात्र हे सर्व खिडकीत बसून पाहत होते
पाऊसाचा आनंद घेत होते
एवढ्यात पाऊस घेऊन आला मोठी सर
थिरकली माझ्या खिडकीवर
विचारू लागली मला
घरात काय बसलीस
बाहेर ये जरा
मी म्हण्टलं नको रे बाबा पाऊसात भिजेन मी जरा
थोडंसं भिजलं तर काही नाही होत ?
थोडे भिजले तर सर्दी होईल मला
उगीचच औषध घ्यावे लागेल
हसत हसत पाऊस म्हणाला
बर बर खिडकीतूनच तू पाहत रहा
मनसोक्त हसत जगत रहा