बोलावणे पाठवतो तो
बोलावणे पाठवतो तो
तनुस वेडावतो
स्पर्श वार्याचा अलगद
हिरव्या रानी खुलतो
जसा फुलांचा पुष्पगंध...
होते बेधुंद मन
वार्यास मिठीत घेऊन
शहारते वेडे हे
शाल धुक्याची पांघरुन...
मनात सामावून
घेते निसर्गातले क्षण
ठेवते जपून ते
साठवलेली आठवण...
पाण्यात सरितेच्या
त्याचे प्रतिबिंब पाहून
लाजते मनाशीच
ते पाण्यात उभे राहून...
वाहणारे उदक
ते तनासवे मनासही
नेते नव्या स्वप्नांत
स्पर्शासवे त्या भासासही...
पुन्हा पुन्हा तो क्षण
तनुस माझ्या वेडावतो
भेटण्या रोज त्याला
बोलावणे तो पाठवतो...
