बंध हा प्रेमाचा
बंध हा प्रेमाचा

1 min

19
बंध हा प्रेमाचा
याला मायेची किनार
बहिण भावाचे नाते
जन्मोजन्मी पुरणार
कधी चुळबुळ कधी शातंता
कधी एखादा पाठीत धपाटा
बहिण भावाचे नाते अविरत
सोसावा कधी प्रेमळ रपाटा
लटका राग कधी ओरडा
मिळून खातात दोघेही
अडचणीत मात्र हात धरूनी
सामोरे जातात दोघेही
लागली ठेच एकाला तर
डोळे पाणवती दोघांचे
या पवित्र नात्याला जपती
कौतुक असे दोघांचे