STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

बकुळ फुला

बकुळ फुला

1 min
13K

आज जरा कौतुकच घडलं

एक बकुळ फूल नजरी पडलं

व्हॉट्सअॅपच्या शुभसंदेशाखाली

अक्षराऐवजी तेच शोभून दिसलं


आठवणींची गाडी वेगाने धावली

बकुळ फुलांची आठवण गाठली

शाळेच्या आवारात एकमेव अशी

बकुळ झाडाची सावली हसली


छान सडा पडलेला असायचा

सुगंध बकुळीचा दरवळायचा

खेळाच्या तासाला मैदानावर

फुले वेचायचा, छंद असायचा


लहान, नाजूक बकुळ फूल

पण आकार रेखीव, सुंदर

शाळेतून घरी परतताना

फुले न्यायची ओंजळभर


आजही माझ्या मनाच्या कोपऱ्यातून

बकुळ फुलांचा सुगंध दरवळतोय

श्वासात विरघळलेल्या सुगंधातून

आठवणींचा कोपरा उजळतोय


Rate this content
Log in