बी
बी
1 min
27.9K
ओल होती ओल आहे का ढगाच्या आतमंदी
स्वप्न जगतो हिरवळीचे,मी मनाच्या आतमंदी।।
घास देण्या तू बरसना,ह्या धरेच्या लेकराला
पावसाळ्या धाव घेतू, ये मृगाच्या आतमंदी।।
धडपडे अंकूरण्याला,जग नवे हे पाहण्याला
वाट पाहे पावसाची, ढेकलाच्या आतमंदी।।
ओल थोडी ऊब थोडी,कास्तकारी चोख थोडी
वेध घेतो जीवनाचा,मी घनाच्या आतमंदी ।।
माणसाला ओढ असते, येत जा तू पावसाळ्या
ध्येय ठरते जोश भरते, जल मनांच्या आतमंदी।।
शिवकवीला साथ दे तू,नापिकीशी झुंजन्याला
तू हवेतर ये सकाळी, वादळाच्या आतमंदी।।
