भूतदया
भूतदया
1 min
30
खूप पूर्वी मर्कटापासून
आजचा मानव घडला
हा मानव कायमच पुढे
निसर्गापुढे सदा नमला....
मानव प्रेम करतो सृष्टीवर
या गोल हरीत वसुंधरेवर
मानवावर अन प्राण्यांवर
भूतदया दावी हा सर्वांवर.....
मनापासून जीव लावतो
मुक्या,अबोल जनावरांना
लेकरापरी छान सांभाळतो
पाळलेल्या या प्राण्यांना....
वृक्षांची पण निगा राखतो
अंगी भेतदया बाळगतो
शेतात धान्यही पिकवतो
अन्नधान्याची व्यवस्था करतो...
