बहुरंगी आयुष्य
बहुरंगी आयुष्य
1 min
411
आयुष्याचे वरदान
देई ईश्वर मानवा
पूर्व प्राक्तनांनुसारे
सुख दुःखांच्या जाणीवा (1)
आयुष्याची वाट असे
कधी मऊ हरळीची
कधी कंटकांची दाटी
कधी वाट वळणांची (2)
कधी सुखांचा वर्षाव
कधी चांदणगालिचा
कधी दुःखाच्या खाईत
क्षण अश्रूप्रपाताचा (3)
दान पाठपूजेपेक्षा
श्रेष्ठ मानवताधर्म
पुण्याईच्या भारे झोळी
वाहे भरुनी सत्कर्म (4)
आयुष्याचा रंगमंच
सदा फिरताचि असे
अज्ञातचि मानवासी
क्षण अखेरचा असे (५)
