बहुपेडी स्त्री
बहुपेडी स्त्री
1 min
144
जन्म देतसे माऊली मजला
अवघड कळा वेणा सोसूनी
जोजविले वाढविले शिकविले
अनंत कष्ट यातना भोगूनी
मोठी बहीण माझी ताई
प्रेमाने मज न्हाऊ घालते
गाणी गोष्टीत मज रमवूनी
शिस्तीमधे अभ्यासही घेते
सखी माझी जीवाभावाची
गूज मनीचे मज सांगते
चिंचा बोरे खिशात भरुनी
मजसवे गप्पा मारत खाते
सखी सहचरी जीवनाची
सर्वस्व पतीस अर्पिते
प्रेम मनोभावे करुनी
संसारनौका तारते
छोटीशी बबूडी माझी
पायी पैंजण छुमछुमती
प्रेमाने मज मिठी मारता
स्वर्ग अवतरे भूमीवरती
