STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

भक्तीचा महापूर

भक्तीचा महापूर

1 min
190

वारकरी भक्तीभावे

विठ्ठलाच्या वारीमधे

पांडुरंग भेटीचिये

आस लागे मनामधे   (१)


वर्षे कितीक लोटली

भक्तीमार्ग हा वारीचा

मनी श्रद्धाभाव दाटे

नाम विठ्ठलाचे घेता    (२)


हरीनाम भजनात

धुंद टाळ्या गजरात

वारी चाले अभंगात

दाटे आनंद मनात     (३)


चाले अश्वाचे रिंगण

भक्तां सहस्त्र भोजन

टाळ चिपळ्या गजर

करी नाचून भजन      (४)


भावभोळा भक्तिभाव

देव जाणे मनोमनी

कृपा करी भक्तांवरी

भक्ती खरी पारखूनी   (५)


मेळा नाचे वैष्णवांचा

आषाढीला वाळवंटी

महापूर हा भक्तीचा

देव मनी सुखावती   (६)


साहित्याला गुण द्या
लॉग इन