भक्ताविना देऊळ
भक्ताविना देऊळ
1 min
208
कुणी येईना दर्शना
झाले मंदिर उदास
भक्ताविणा दिसे सुना
वाटे गाभारा भकास (1)
रुखरुख लागे मनी
बोले राऊळ देवाला
कधी , कसे बा , येतील
देवा भक्त दर्शनाला (2)
आली ज्येष्ठी एकादशी
कसे भक्त निघतील ?
सारे कसे शांत शांत
कसे तुला भेटतील ? (3)
देव बोले मंदिराला
नको सोडू अशी आस!!
भक्त गांजले रोगाने
तरी आहे माझा ध्यास (4)
नाही आले देवळात
तरी श्रद्धा मनी दाट
मीच जातो भेटीलागी
नको पाहू अशी वाट (5)
देवळाच्या मनातील
भ्रांत सारी मिटवली
लख्ख प्रकाश पडला
ज्ञानज्योत पेटवली (6)
