भीती
भीती
1 min
219
तुला पाहताच सारी
स्वप्ने खरी वाटू लागली
मरणाची आता मला
खरी भीती वाटू लागली
जगण्याचे हिशोब कधी
मी ठेवलेच नव्हते
आता क्षणाचीही पर्वा
कराविशी वाटू लागली
कण कण सुखाचा मी
आता वेचु लागली
ना व्हावे काही नजरे आड़...
पुन्हा पुन्हा खात्री करु लागली
बांधून ठेवलेत मी
स्वप्न ते उराशी
दबक्या पावलांची
धास्ती वाटू लागली
