Manisha Awekar

Others


3  

Manisha Awekar

Others


भेटीलागी आस

भेटीलागी आस

1 min 170 1 min 170

भेट कधी व्हावी देवा / वारी बंद झाली यंदा /

विठू रुसला अवंदा / भक्तांवरी (1)


नको देवा असा रुसू / हाती नव्हते रे येणे /

तूच आता देवा येणे / भक्तांघरी  (2)


नियमांचे घट्ट बंध / जाणसी तू सर्वज्ञानी /

भोळा भाव भक्तांमनी /अखंडित  (3)


कसे सांगू शब्दांमधी / मन माझे घायकुती /

पालख्या रे निघती / भेटीप्रती (4)


अर्पिले मी पांडुरंगा /मन माझे तुजलागी / 

ओढ मनी भेटीलागी / लागलीसे (5)


Rate this content
Log in