भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
1 min
238
अनाथांची होती माता
सेवाभाव जपे मनी
वंदन त्रिवार माते
किर्ती तुज त्रिभुवनी
अभागी बालकांना तू
माया ममता दिधली
कृपाछत्राखाली तव
जीवने तू उद्धरली
बालकांचा तू आधार
दिले त्या नवजीवन
कष्ट सोसुनी जीवनी
सार्थकी तव जीवन
कीर्तीरुपाने जगती
अखंडचि आस्तित्वास
शांती आत्म्यास लाभो
विनंती परमेश्वरास
