भावनांचे जाळे
भावनांचे जाळे

1 min

204
काव्यप्रकार अष्टाक्षरी
भावनांचे घट्ट जाळे
मनी मानवाच्या असे
कधी उद्रेक तयाचा
कधी मनी दाबतसे (1)
सुख-दुःख जीवनात
बदलत्या फेऱ्यापरि
कधी अश्रूपात तर
कधी आनंदाश्रू सरी (2)
सूड, असूया, मत्सर
मना असती पदर
फणा काढती वेगाने
शत्रू पाहूनी सत्वर (3)
स्नेह, लोभ, दया, माया
मना देती नित्य शांती
पुण्य वेचूनी जीवनी
यश, आशिर्वच घेती (4)
भावनांचा गोफ मनी
सदा झुलतचि असे
राग-लोभ त्रिज्येवरी
मनू क्रोध जिंकतसे (5)
भावनांची झूल कुणी
पाठीवर टाकतसे
कर्तव्याचा धनू हाती
प्रयत्नाने जिंकतसे (6)