भारतमाते तुझ्यासाठी
भारतमाते तुझ्यासाठी
भारत माते तुझ्या
रक्षणा अर्पीन मीही प्राण
शत्रुसंगे झुंजही घेईन
माय पित्याची आण
तुझ्या सावलीत जगलो रमलो
घेतला सुखाचा श्वास
तिरंगा लहरावा उंच नभी
ही एकच मनीची आस
दावून देईल जगताला मी
वाढवेल तुझी ग शान
शत्रुसंगे झुंजही घेईन
माय पित्याची आण
एक बाजूला ड्रॅगन पिवळा
एक बाजूला हिरवा राक्षस
सतत काढती तुझी खोडी
घ्यावया टपले तुझा घास
ठेचून टाकीन त्यांची नांगी
युद्धी दाविन त्या आसमान
शत्रुसंगे झुंज ही घेईन
माय पित्याची आण
शत्रुसंगे लढता-लढता
कधी मजसी मृत्यूही येईल
एकास दहा हे माप ठेवुनी
कुशीत तुझिया अमरच होईन
मरतानाही हाती तिरंगा
गाईन तुझेच गान
शत्रुसंगे झुंजही घेईन
माय पित्याची आण